-लोकसंग्राहक कौतिक तांबे ह्या शिक्षकाचा ज्ञानदानातील प्रेरणादायी प्रवास..
-अद्वितीय आणि अर्थपूर्ण सेवानिवृत्तीच्या सर्व स्तरातून शुभेच्छा..!
आश्वी संजय गायकवाड शिक्षक ही निर्मिकाने दिलेली सुंदर भेट आहे असे मानव निर्मित साहित्यात वर्णनीय झाले आहेत कारण शिक्षक हा एका चांगल्या राष्ट्राचा निर्माता असतो तो देशाचे उज्वल भविष्य घडवत असतो,शिक्षक आपल्याला कोणत्याही स्वर्थाशिवाय यशाचा मार्ग दाखवतात चांगले वर्तन आणि नैतिकतेची व्यक्ती होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतात शिक्षकांशिवाय जीवनात मानसिक सामाजिक आणि बौद्धिक विकास होऊ शकत नाही असेच सांस्कृतिक जाणिवेसह आपली सामाजिक जाणीव प्रगल्भ असलेले संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कौतिक पाटीलबा तांबे हे रसिक व्यक्तीमत्व होय.
सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावलेल्या प्रवरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या आश्वी पंचक्रोशीत असलेले चिंचपूर हे सरांचे मुळ गाव येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास ज्ञानार्जन करत करत ज्ञानदानाच्या सर्वाच्च स्थानी पोहचत याच मातीवर शासन निर्णयानुसार थांबत असला तरी के.पी.तांबे सरांची ज्ञान जिज्ञासा समाजाला अंतर्मुख करणारी ठरणार हि काळ्या दगडावरची रेघ
ज्ञान आणि कलेचा संगम असलेले कौतिक तांबे सरांची वाटचाल गेली चार दशके विद्यार्थ्यांच्या मनात दीपस्तंभासारखे उजळून राहिले आहे त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आणि विस्तार अधोरेखित करण्यासारखा आहे
१९९२ पासून न्याहारवाडी (खांबे) येथे प्रथम नियुक्ती पुढे चणेगाव,जाधव वस्ती लवनवाडी,आश्वी बुद्रुक मुले चिंचपूर व निमगाव जाळी अशा अनेक शाळांतून सेवा करत सरांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवले.त्यांच्यासाठी शाळा म्हणजे फक्त शिकवण्याची जागा नव्हे, तर ती विद्यार्थ्यांना घडवण्याची प्रयोगशाळा होती. कलेचा स्पर्श असलेले शिक्षण प्राप्त के.पी तांबे सर हे लहानपणापासूनच उत्तम फोटोग्राफी,चित्रकार,मूर्तीकार असून त्यांनी कला आणि शिक्षण यांचा अमोघ संगम साधला आहे अनेक मंदिरातील व मंदिरावरील मूर्ती तयार करण्याचे काम त्यांनी अमोघ हस्त कौशल्याने केले आहे त्याबद्दल प्रवरा चाळीसक्रोशीत त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.विज्ञान व गणित प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीत सलग दहा वर्ष प्रथम क्रमांक,
शाळेच्या भिंतींवर ज्ञानाची रंगीत चित्रे
नाटक,प्रदर्शन आणि सर्जनशील प्रकल्पांतून विद्यार्थ्यांना दिलेला नवा अनुभव प्रत्यक्ष अनुभवातून कृतीयुक्त शिक्षणामुळे त्यांना कलाश्री पुरस्कार (१९९३),आदर्श प्रशिक्षणार्थी (१९९७),
ज्ञानगंगा पुरस्कार (२००५ अश्विनी पतसंस्था अशी बुद्रुक आदर्श शिक्षक पुरस्कार २००६ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात -राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१५ संगमनेर तालुका पोलीस पाटील संघातर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार -२०२४
पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
ही पुरस्कारांची मालिका म्हणजे त्यांच्या कार्याची केवळ नोंद नसून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आदराचं प्रतिबिंब आहेत.त्यांच्या यशदायी वाटचालीत पत्नी सौ.मंगल हिच्या प्रेरणादायी साथीने मी खरे तर घडत गेलो तिच्या शिवाय मी अपुर्ण आहे असे भावनिक होत के.पी.सर बोलत होते,तर कौलाघात खऱ्या कलाकाराची प्रतिभा काळाच्या पडद्याआड जाऊ नये असा त्यांचा होरा आहे.
प्रसंगी विद्यार्थ्यां आठवणी सांगताना म्हणतात की तांबे सरांनी आम्हाला गणित शिकवलं पण त्याचबरोबर आयुष्य कसं जगायचं हेही शिकवलं. त्यांच्या शिकवणीतून आत्मविश्वास मिळाला.तर दुसरी विद्यार्थिनी म्हणते
सर म्हणायचे – कला आणि शिक्षण एकत्र आलं की मुलं मोठं स्वप्न बघायला शिकतात.आज मी डॉक्टर झाले, त्याचं श्रेय तांबे सरांनाच जाते.
यंदाचा शिक्षकदिन खास ठरणार आहे.५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा लोणी संगमनेर महामार्गावर चिंचपूर येथील सप्तपदी लॉन्स मध्ये राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सेवापूर्ती समारंभ आणि सत्कार होणार असून या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा सोहळा म्हणजे त्यांच्या चार दशकांच्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीस मिळालेल्या समाजाचा सन्मान आणि कृतज्ञतेचा अभिषेक आहे.
कौतिक तांबे सरांचा प्रेरणादायी प्रवास सांगतो की शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक दीपस्तंभ
शिक्षक आपल्या आचार विचार यातून विद्यार्थ्यांना आदर्शवत करू शकतो
कलेच्या स्पर्शातून दिलेलं शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचं कोरलं जातं
के.पी.तांबे सरांची शैक्षणिक वाटचाल ही खरं तर एक प्रेरणादायी कहाणी आहे,त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व एका बातमी आणि लेखात बसणारे नाही त्याचे पुस्तक व्हावे अशी अपेक्षा कारण त्यांची धडपड आजही समाजाला सांगते “शिक्षण हेच सर्वात मोठं दान,आणि शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे.