सध्या मुंबईत मराठा आरक्षणसंबधी आंदोलन/उपोषण सुरू आहे,त्यानिमित्ताने काही आंबेडकरवादी बहुजन लोक सोशल मीडियातून अपेक्षा व्यक्त करीत आहेत की, मनोज जरांगेनी स्टेजवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का?नाही ठेवला.. फोटो ठेवायलाच पाहिजे वगैरे वगैरे. छाया रेखाकन प्रकाश कदम
परंतु माझा प्रश्न हा आहे की,या आंबेडकरवादी बहुजनांनी त्या अडाणी बेवड्या नेत्याकडून अशी अपेक्षाच का करावी?? जो स्टेजवर बसल्याजागी गुटखे तंबाखू खाऊन दिवसभर शिवरायांच्या पुतळ्याखाली थूंकत बसलेला दिसतोय.अशा ठिकाणी तुम्ही लोक बाबासाहेबांचा फोटो ठेवण्याची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही मुर्ख आहात.जिथे ज्या गोष्टीची जाण नाही तिथे त्या गोष्टीची आवश्यकता नाही याचे भान आपण ठेवावे.
काही प्रसिद्धीसाठी हपापलेले कथित आंबेडकरवादी नेते आपल्याला काही सामाजिक राजकीय सहानुभूती मिळेल या आशेने हिरोगिरी,चमकोगिरी करीत त्याठिकाणी जाऊन समर्थनार्थ भेट देत आहेत,त्याची सुद्धा काहीही आवश्यकता नाही. कारण हे आंदोलन ना विधायक आहे,ना या आंदोलनाला विधायक नेतृत्व आहे,ना हे आंदोलन योग्यप्रकारे पुर्णत्वास जाणार आहे,अर्थात या निराधार आंदोलनाला ना बुड आहे ना माथा.मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही,
परंतु समर्थन असण्याचेही काही कारण नसावे.आरक्षणाचा नावाखाली चालू असलेले हे जरांगेचे आंदोलन राजकीय वरद हस्ताने जास्त प्रेरित असल्याचे दिसते.जे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सुरू होत असते.
शिवाय मुंबईतील रस्त्यांवर चाललेले विचित्र चाळे आणि जत्रेला आल्यासारखी हुल्लडबाजी बघून सहज लक्षात येईल की,आंदोलक त्यांच्या आंदोलनाबाबत किती गंभीर आहेत.आंदोलनातील बेशिस्ती बघून इतर बहुजनांनी हे जरुर शिकले पाहिजे की,आंदोलन कसे नसावे.रस्त्यावर चाललेले पोरखेळ आणि बालिशपणाचे व्हिडिओ पाहून आंदोलक त्यांच्या समाजाची हाताने चव घालवून घेत आहेत की काय म्हणून गावाकडचे त्यांचेच नातेवाईक सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
थोडक्यात हे दिखाऊ आंदोलन मूळात आरक्षणासाठी नाही, त्यामुळे आंबेडकरवादी बहुजनांनी याबाबत सध्या तटस्थ राहणेच योग्य राहील.भविष्यात विधायक व योग्य भूमिकेतून तसेच योग्य नेतृत्वाखाली आणि ओबीसींवर अन्याय होणार नसेल अशाप्रकारचे मराठा आरक्षणाचे आंदोलन उभे राहिलेच तर त्यास नक्की समर्थन द्यावे.
- हर्षद रुपवते मुक्त पत्रकार आणि लेखक