नाशिक दिनकर गायकवाड सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या दृष्टीने नवरात्रोत्सवासाठी गडावरील व्यावसायिकांनी आपल्या दुकानात आवश्यक विविध वस्तूंची खरेदी करुन आणलेला माल आपल्या दुकानात थाटण्यासाठी सरसावले आहे.
नवरात्रोत्सव हा केवळ आध्यात्मिक चिंतन आणि उत्सवाचा काळ नाही तर व्यवसायांसाठी बाजारपेठेत चमकण्याची सुवर्णसंधी देखील आहे. नवरात्रीच्या नऊ रात्री ज्याप्रमाणे भक्ती आणि समर्पणाने भरलेल्या असतात, त्याचप्रमाणे व्यवसायाची भरभराट करणाऱ्या ठरतात. सप्तश्रृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवात राज्यभरातून लाखो
भाविक हाजारो भाविक पदयात्रेने तर लाखो भाविक वाहनाने सालाबादप्रमाणे गडावर हजेरी लावतात. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व कोजागिरी उत्सावाचे दोन दिवस या कालावधीत किमान दहा लाख भाविक उपस्थित राहतात. त्या दृष्टीने गडावरील व्यावसायिकांची लगबग सुरु आहे. गडावर सर्वसाधारणतः अडीचशे ते तीनशे व्यावसायिक विविध प्रकाराचे व्यवसाय करतात. मात्र, यात्रा कालावधीत बाहेरील व्यावसायिक त्याचपटीने येत असल्याने व्यावसायिकांची संख्या पाचशेच्या पुढे जाते. या काळात नारळ, हार, फुले, प्रसाद, देवीचे फोटो, खेळणी, साड्या, पेढे, पादत्राणे, बांगड्या, हळद, कुंकू,
चुनरी या व अशा अनेक प्रकाराच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्याजातात.दरम्यान, या सर्व वस्तू घाऊक पद्धतीने खरेदी करण्यासाठी व खरेदी केलेला माल पैकीग करून थाटण्याची गडावरील व्यावसायिकांची लगबग सुरु झाली आहे. दोन दिवसांचा कालावधी नवरात्रीसाठी राहिला असल्याने व्यावसायिकांना जागा आरक्षित करणे, दुकानाची मांडणी करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. हे सर्व नियोजन आखताना खरेदीसाठी व्यावसायिकांनी गती दिली आहे. यात्रोत्सव कालावधीत गडावर पेढ्यांची विक्री प्रसाद ख्यात मोठ्या प्रमाणावर होते. जवळपास शंभरावर पेढेविक्रेते गडावर हा व्यवसाय करतात. धाराशिव जिल्ह्यातील पाथरुड येथून हे पेढे गडावरील व्यापारी खरेदी करतात. दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची यादृष्टीने लगबग सुरु झाली आहे.
विविध वस्तूंच्या खरेदीसाठी वेग आला आहे,प्रसादासाठी साखरी फुटाणे, रेवड्या, खडीसाखर, लाह्या, मुरमुरे, फुटाणे हेबहुतांश व्यावसायिक नाशिक येथून खरेदी करतात. मालेगाव येथून साड्या, शालू, पैठणी यांची खरेदी केली जाते. हळद, कुंकू पंढरपूर येथून खरेदी केले जाते. नारळ आंध्र प्रदेश येथून घाऊक स्वरुपात खरेदी केले जातात. बांगड्या,शोभेचे हर, खेळणे व विविध वस्तू मुंबई येथून खरेदी करण्यात येतात. विविध रांगाच्या चुनरी गुजरात राज्यातून होलसेल भावात खरेदी केल्या जातात. फुलांचे हार स्थानिक पाताळीवर परिसर व नाशिक भागातून खरेदी केले जातात.
