नाशिक दिनकर गायकवाड रस्ता ओलांडणारी महिला भरधाव बुलेटच्या धडकेने ठार झाल्याची घटना दिंडोरी नाक्याच्या जवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी अनिल दत्तू पवार (रा. म्हाडा बिल्डिंग, दिंडोरी रोड) यांची आई हिराबाई पवार (वय ४८) ही तारवालानगर सिग्नलकडून दिंडोरी नाक्याकडे येणाऱ्या रस्त्यावर अवधूतवाडी, पंचवटी येथे रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव आलेल्या एमएच १५ जीएच १३२३ या क्रमांकाच्या बुलेटवरील चालकाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बुलेटस्वार जागेवरच गाडी सोडून पळून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बुलेटस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.