नाशिक दिनकर गायकवाड दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे.
५ सप्टेंबर या शिक्षकदिनी १४ वेगवेगळ्या माध्यमातील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. मनपा शिक्षण विभागाकडे यासाठी ३१ प्रस्ताव प्राप्त झाले असून, शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. यंदा महापालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमधील सहा, ऊर्दू २, हिंदी २ तसेच माध्यमिक शाळांमधील २, तसेच खासगी शाळांमधील २ शिक्षकांना
आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांमधून प्रस्ताव मागविले होते. यामध्ये महापालिका संचलित मराठी माध्यमाच्या शाळांमधून २०, ऊर्दू ३, माध्यमिक ४, तर खासगी शाळांमधून ४ प्रस्ताव प्राप्त झाले. शिक्षक पुरस्कारांसाठी निवड करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त करिश्मा अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांच्या छाननी समितीकडू होईल. छाननीत निवड झालेल्या शिक्षकांची प्रत्यक्ष शाळा पातळीवर पडताळणी केली जाईल.