नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या झी २४ तासचे पत्रकार योगेश खरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर पार्किंगची वसुली करणाऱ्या गावगुंडांनी हल्ला केला.या हल्ल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस ठाण्यात येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन या गावगुंडांवर पत्रकार हल्लाविरोधी कलम लावून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
