जानोरीत जिवंत देखाव्यांची परंपरा; प्रेक्षकांची अलोट गर्दी

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे अनेक वर्षांपासून गावात गणेशोत्सव काळात जिवंत देखाव्यांची परंपरा सुरू आहे.ही परंपरा करोना काळात बंद पडली होती.परंतु २०२१ नंतर तरुण पिढीने पुन्हा आपली कला दाखवण्यासाठी सुरुवात केल्याने गावात सजीव देखाव्यांची परंपरा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
लहान-मोठी दहा ते पंधरा गणेश मंडळे आहेत.ती दरवर्षी वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती स्थापन करून दहा दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. या उत्सवात प्रत्येक मंडळ दररोज रात्री वेगवेगळे सजीव देखाव्याचे सादरीकरण त्यामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, देवीदेवता, संस्कृती, शैक्षणिक, स्वच्छता अभियान, शेतकरी आत्महत्या अशा अनेक विषयांवर दररोज वेगवेगळे सजीव देखाचे दाखवले जातात.

देखावे बघण्यासाठी परिसरातील ओझर, मोहाडी,आंब, शिवनई, बरबंडी, अक्राळे, खतवड, साकोरे या गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ येतात.त्यामुळे गावास रात्रीच्या वेळेस जत्रेचे स्वरूप बघायला मिळत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!