आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुका तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त तालुका मुख्याध्यापक एकनाथ सखाराम ताजणे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.खा. डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे ताजणे परिवारास सांत्वन भेट देताना डॉ. विखे बोलत होते दिवंगत एकनाथ ताजणे यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करत असंख्य पिढ्या घडवल्या.त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.शिक्षणाबरोबरच ते सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व गावविकास उपक्रमांमध्येही सक्रिय होते. आपण एक प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि जिव्हाळ्याचा शिक्षक आपण गमावला आहे."
त्यांचा शैक्षणिक प्रवास वाखाण्याजोगा आहे.
ताजणे गुरुजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रेमगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून केली. त्यानंतर ओझर बुद्रुक, दाढ खुर्द (हानुमंतवाडी), वनकुटे, मनोली, मांलुजे या शाळांमध्ये शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले)आश्वी बुद्रुक येथे तब्बल १८ वर्षे तसेच पेमगिरी येथे १२ वर्षे सेवा देत त्यांनी पायाभूत सुविधा उभारणी, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय, खेळाचे मैदान, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली.
तालुका मुख्याध्यापक म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्यात शाळा दर्जावाढ मोहीम, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा,पालक सभा आयोजन,आणि शाळा सुशोभीकरण उपक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या पुढाकाराने अनेक शाळांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.
गुरुजींचा दृष्टिकोन केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणी, अनुशासन व मूल्य शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. असे डॉ.विखे म्हणाले.
-तर्ककठोर साक्षेपी पत्रकारांची सांत्वन भेट
प्रसंगी या सांत्वन भेटीसाठी आश्वी पंचक्रोशीतीत नावाजलेले पत्रकार वैभव ताजणे,प्रेस फोटोग्राफर सचिन ताजणे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी (लोणी कार्यक्षेत्र)पुष्पावती ताजणे,प्रतिक्षा डाके, गीतांजली भुजबळ, नामदेव ताजणे,सोमनाथ ताजणे, नितीन ताजणे, रामनाथ ताजणे, योगेश ताजणे, सरुनाथ उंबरकर, सरपंच सुशिला मेहेत्रे, दादा पाटील मेहेत्रे,युवा नेते संतोष मेहेत्रे, भानुदास पवार,अमोल ताजणे, नवनाथ ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
