नाशिक दिनकर गायकवाड पेठ आगाराची एमएच १४ बीटी ३५९८ क्रमांकाची शालेय विद्यार्थिनीसाठी मानव विकासची सायंकाळी ५ वाजेची बस पेठहुन आडगावकडे भरधाव जात होती. त्यावेळी वळणावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने लगतच्या सागाचे झाड व दगडाला बस अडकल्याने पुढील अनर्थ टळला २५ हुन अधिक प्रवासी असलेल्या बसमधील विद्यार्थिनी आरती जनार्दन महाले (वय १७ वर्ष), मोनिका विलास दरोडे (वय १६), अंकिता बाळू गुजर (वय १८) सर्व राहाणार हनुमंतपाडा (भुवन) यांच्या डोक्यास, तोंडाला मार लागला. इतर विद्यार्थी, विद्यार्थिनीबरोबरच प्रवाशांना किरकोळ मार लागला.
पेठ येथील शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी बसमध्ये बसले. नेहमीप्रमाणे पेठ तोंडवळ भुवन या मार्गावरुन बस न नेता चालकाने परस्पर पेठ-अंधुटे मागनि भुवन मार्गावरून बस नेली.
त्यावेळी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या झाडावर आदळली. या आघाताने विद्यार्थिनी व प्रवासी जोरदार धक्याने पुढील लोखंडी बाकावर आपटून जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी त्वरेने भुवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने जखमींना पेठ ग्रामीण
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.आगार व्यवस्थापक बेलदार यांनी ग्रामीण रूग्णालयात जखमी प्रवाशी व विद्यार्थ्यांची माहीती घेऊन तातडीची मदत उपलब्ध करून दिली. पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
