नाशिक दिनकर गायकवाड जानोरी नाशिक एअरपोर्ट ते राष्ट्रीय महामार्गावरून मुख्यमंत्री प्रवास करणार होते.परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यांना दुसन्या पर्यायी रस्त्याने मार्गक्रमण करावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या सत्याने प्रवास करावा लागला.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
नाशिक जिल्ह्यात अतिमहत्त्वाचा समजला जाणारा नाशिक एअरपोर्ट जानोरी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. दसरोज होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासकीय कार्यक्रमानिमित्तनाशिक येथे याच रस्त्यावरून जाणार होते. परंतु रस्त्याची अवस्था बघता त्यांनी दुसऱ्या रस्त्याने जाणे पसंत केले. सर्वसामान्य माणसाचा दैनंदिन प्रवास कसा होतो, याबद्दल न विचारलेलेच बरे,या रस्त्याचे काम कुंभमेळ्यापूर्वी होणार अशी चर्चा आहे. परंतु सध्या तरी कामाला कुठलीही सुरुवात झाली नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरून जानोरी एमआयडीसी, अक्राळे एमआयडीसी, मोहाडी येथील
सह्याद्री कंपनीमध्ये जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हा रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झालेला असतानादेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कुठलीही दुरुस्ती केली नाही. जानोरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजवले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कामकाजामुळे हा रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या सत्यावर दुचाकीचालकांना अक्षरक्षः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी सार्वजनिक चांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
जानोरी एअरपोर्ट ते दहावा मैल रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे अपघातांच्या संख्येत बाढ झाली आहे.
कुणाल बागुल, सदस्य, ग्रामपंचायत, जऊळके दिंडोरी
-मोहाडीच्या शेतकरी प्रवाशांची रस्त्यावर कसरत
जानोरी ते नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकरीवर्गाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
लक्ष्मण देशमुख, ग्रामस्थ, मोहाडी
