नाशिक दिनकर गायकवाड इंदिरानगर भागात दूषित, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने परिसरातील संतप्त महिलांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भातील तक्रारीचे निवेदन दिले.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अशा दुर्गंधीयुक्त गढूळ पाणीपुरवठ्यामुळे परिसरातील लोकांना जुलाब,उलट्या,पोटाचे विकार,स्कीन प्रॉब्लेम वाढले आहेत. पाण्यातून अळ्या आणि पाण्याला दुर्गंधी येत आहे. यासंदर्भात वेळ काढून धोरण अवलंबिले जात असल्याची तक्रार करीत या भागातील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणाची नाशिक महानगर पालिकेकडे लेखी तक्रार केलेली आहे.
त्यावर कामही चालू आहेत.
परंतु अजूनपर्यंत ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे कंटाळून इंदिरानगर परिसरातील महिलांनी आयुक्तांना भेटून निवेदन दिले आणि यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काल
श्री लक्ष्मी पार्क,श्री गणेश पार्क,प्रगती अपार्टमेंट, गणाधीश अपार्टमेंटमधील महिला मीना बोडके, पूनम सोनार, संपदा कारेगावकर, सुदीपता सुरंजे, दीपाली कुलकर्णी,माया जोशी, स्नेहल विसपुते, मीना जोशी, विनया मुंगी, गमला मिश्रा,मिलिंद खांबेटे, शाम कारेगावकर,सुरेश बोडके,मुकुंद मुंगी आधी सहभागी झाले होते.मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पाणीपुरवठा अधिकारी धारणकर यांनी शिष्टमंडळाला दोन दिवसात ही अडचण सोडवली जाईल,असे आश्वासन दिले असता परिसरात तो पर्यंत स्वच्छ पाण्याचे टँकरद्वारे व्यवस्था करावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
