सेवानिवृत्त अभियंता कवीची काव्यप्रतिभा
अहिल्यानगर कृष्णा निकम नाऊरकर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे च्या सावेडी उपनगर व न्यु आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय साहित्य व नाट्य संमेलनात सेवानिवृत्त अभियंता राजहंस देसाई यांनी अभियंत्यांचे जीवन दर्शन आपल्या काव्यात सादर करीत युवा संमेलनात काव्य प्रतिभेचे दर्शन घडविले. या वेळी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.त्यांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी संमेलनाध्यक्ष गौरी देशपांडे,स्वागताध्यक्ष डॉ.प्रशांत भालेराव,कवी कट्टा अध्यक्ष चंद्रकांत पालवे,कवी कट्टा सन्मवयक प्रा.गणेश भगत, कवी कट्टा प्रमुख अतिथी प्रा.शशिकांत शिंदे,सह समन्वयक सायली देशपांडे, नरेंद्र फिरोदिया,जयंत येलुलकर डॉ.बाळासाहेब सागडे आदी उपस्थित होते.
