शेडगाव हादरले! चिमुकल्यावर हिंसक बिबट्याचा हल्ला

Cityline Media
0
आई-आजीच्या बहादुरीने वाचला जीव,श्रीधरची प्रकृती स्थिर

आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे काल (दि.११) सायंकाळी प्रवरा नदीवरील नवीन पुलालगत चार वर्षीय श्रीधर बंडु फड याच्यावर बिबट्याने झडप घालून त्याला उसाच्या शेतात ओढून नेले. या भीषण प्रसंगी आई भारती फड आणि आजी सिंधुबाई नागरे यांनी जीवाची पर्वा न करता धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतून चिमुकल्याला खेचून आणले. त्यांच्या या अद्वितीय धाडसामुळे श्रीधरचा जीव थोडक्यात वाचला.
जखमी अवस्थेत श्रीधरला प्रथम आश्वी खुर्द व नंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर संपूर्ण शेडगाव परिसरात भीती व खळबळ पसरली आहे. या धक्कादायक घटनेची दखल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी घेतली असून मुलाला योग्य उपचार मिळावेत यासाठी संबंधितांना निर्देश दिले होते.

दरम्यान,वनविभागाने तातडीने कारवाई करत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळासह परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले असून गरजेनुसार आणखी पिंजरे बसवले जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे यांनी यावेळी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!