आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील मांचीहिल संस्थेने आयोजित केलेल्या 'विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास योजना' या कार्यक्रमांतर्गत, प्रसिद्ध युवा व्याख्याते आणि समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे सप्टेंबर मध्ये विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
श्री.हंकारे त्यांच्या प्रेरणादायी, सोप्या आणि हृदयाला भिडणाऱ्या भाषणासाठी ओळखले जातात. त्यांचे व्याख्यान तरुणांना जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवते, ज्यामुळे त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत.
हे व्याख्यान १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता रतन टाटा कॉम्प्लेक्स,मांचीहिल येथे होणार आहे. श्री.हंकारे यांच्या या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल,अशी अपेक्षा आहे. सर्व मांचीहिल परिवाराने नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
