आश्वी संजय गायकवाड युवा नेते व मा.खासदार डॉ. सुजय विखे पा. यांनी नुकतीच संगमनेर आश्वी खुर्द येथील प्रभु श्रीराम, श्रीदत्त व पुंजाआई माता संयुक्त मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास भेट दिली.त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सरपंच सौ.अलका गायकवाड, उपसरपंच बाबा भवर विखे पाटील,कारखान्याचे संचालक ॲड.अनिल भोसले, दुधसंस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे,
बाळासाहेब मांढरे,नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे स्विय सहाय्यक बापूसाहेब गायकवाड,कैलास गायकवाड, दत्ता गायकवाड संतोष भडकवाड, मनोज कहार, संजय भोसले, सोपान सोनवणे सागर भडकवाड, शरद सोनवणे, दीपक सोनवणे,संजय गायकवाड आशिष गायकवाड बाबा भोसले गौरव मुन्तोडे शिवाजी शिंदे डॉ.सचिन क्षिरसागर अविनाश शिंदे रामा क्षिरसागर अविनाश सोनवणे मयुरेश शिंदे मनोज मेहरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द हे गाव लवकरच भव्य मंदिराने सुशोभित होणार आहे. या ऐतिहासिक मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांनी तब्बल २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने मंदिरे नव्या रुपात उभी राहत आहेत. तसेच गावातील भाविक ग्रामस्थांचीही मोठी वर्गणीही जमा होत आहे नुकतेच या मंदिराच्या बांधकामाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून स्लॅब टाकण्याचे काम यशस्वीरित्या झाले आहे अभियंता श्रींकात कडलग यांच्या मार्गदर्शना खाली मंदिराचे बांधकाम सुरु आहे तर मंदिर काम तिसऱ्या अंतिम टप्प्यात सुरू झाले आहे
पूर्वी मोडकळीस आलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी गावातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी मंत्री विखे पाटील, युवा नेते डॉ.सुजय विखे पा. व सौ.शालिनी विखे पा. यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विखे कुटुंबीयांचे आश्वी खुर्द गावावर असलेले आत्मीय प्रेम लक्षात घेऊन मंत्री विखे पा. यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला.भव्य बांधकामाची वैशिष्ट्ये ४२x३३ जागेत तिन्ही स्वतंत्र मंदिरे समोर प्रशस्त सभामंडप सात आकर्षक कोरीव बिंब व स्पॅल पूर्ण स्लॅबवर चार सुंदर कळस,जे नांदेड येथील शिल्पकार ‘केंद्रे बंधु’ घडवणार आहे.या संपूर्ण मंदिर प्रकल्पावर सुमारे ४५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
