नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील करंजवण दूध उत्पादक असोसिएशन संस्थेची दुसरी बार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या बातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संजय मोरे होते.
यावेळी धुळे युनिटचे व्हि.जी.पाटील, करंजवण युनिटचे व्यवस्थापक आंबेडकर, पर्यवेक्षका अरुण जाधव, सुनील देशमुख आदी उपस्थित होते. अरुण जाधव यांनी सभेपुढे २०२४-२०२५ चा वार्षिक लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी संस्था सहकारी नियमानुसार कशी चालवावी, याबाबत व्हि. जी. पाटील बांनी मार्गदर्शन केले. तसेच दुधात वाढ व गुणवत्ता सुधारण्यासाठी व वसरी संगोपन पशुखाद्य प्रयसी फीड मिनरल मेगा सोडा एनर्जी यायाविषयी अबिहका यांनी मार्गदर्शन केले.
