शिक्षिका सौ.जिजाबाई नवले यांच्या बदलीमुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी दिला साश्रू नयनांनी निरोप.

Cityline Media
0
श्रीगोंदा कृष्णा निकम तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक परिसरात सौ.जिजाबाई दाते -नवले यांची नुकतीच बदली झाली. प्रसंगी ग्रामस्थांनी निरोप समारंभ आयोजित केला होता.
माजी विद्यार्थी पालक, शिक्षकांनी आपल्या भावनांना भाषणातून वाट मोकळी केली.आपली बदली रद्द करा,काही नेते म्हणाले एक फोन करतो आपण येथेच रहावे.काही पालक व विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षिका दुसऱ्या शाळेत जाणार म्हणून रडू लागले.. गत चार वर्षे झाली शाळेचा कायापालट केला.अनेक विद्यार्थी मंथन, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले.गुणवत्ता यादीत आले. शिस्त, नियोजन,अभ्यास, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सुरू केले.सर्वांगीण विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षिका सौ.जिजाबाई नवले यांनी केले.याची दखल पालक व ग्रामस्थांनी घेऊन भरभरून कौतुक केले. हळहळ व्यक्त केली. मॅडम तुम्ही परत या..  मॅडम तुम्ही परत या..अशी अपेक्षा व्यक्त केली. अविस्मरणीय अनुभव, अविस्मरणीय क्षण शिक्षक व विद्यार्थी व पालकांनी अनुभवला,शेवटी आठवणींचे क्षण आठवत नवले मॅडम यांनी शाळेला भावनिक ऋणानुबंध कायम ठेवत निरोप घेतला. व विद्यार्थी व पालकांनी पुन्हा या येथेच रहावे असा आग्रह धरत जड अंतःकरणाने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!