नाशिक दिनकर गायकवाड जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने कळवण येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या गुरुदत्त स्पोर्ट्स क्लब बैडमिंटन कोर्टकर दि. २ ते ४ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय बैडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कळवण येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विविध वयोगटातील विद्याथ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरीच्या जोरावर यश संपादन केले.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
१४ वर्षे वयोगटाखालील मुलांच्या स्पर्धेत अस्तित्व अनूप पवार याने द्वितीय स्थान राखले तर याच वयोगटातील मुलीच्या स्पर्धेतहसिनी जगदेव हिने द्वितीय स्थान राखले.१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत रिबर्ड मिसाव याने प्रथम स्थान पटकावले तर अश्विन कापडणीस याने तृतीय स्थान राखले.
याच बयोगटातील मुलींच्या टीमइव्हेंट प्रकारात प्रणवी पवार,भार्गवी महाले,शरण्या सूर्यवंशी व भूमिका पवार या विद्यार्थिनींनी प्रथम स्थान पटकावले १९ बर्षे वयोगटाखालील टीम इव्हेंट प्रकारात फजल पटेल, ऋग्वेद कापडणीस, तन्मय मानकर, आर्यन अहिरे व पार्थ जाधव या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्या विद्याथ्यांची निवड विभागीय बॅडमिंटनस्पर्धेसाठी झाली आहे.
त्यांना शाळेचे बैडमिंटन प्रशिक्षक राकेश कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व बॅडमिंटन प्रशिक्षक राकेश कुमार यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, शाळेचे चेअरमन शैलेश पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल अप्राचार्य डॉ. अविनाश लांडगे आदींनी अभिनंदन केले आहे.
