नाशिक दिनकर गायकवाड येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती दिली.याप्रसंगी एन. एम. सोनजे, विनायक ढोले, कृष्णा भवर, संतोष केदार, दीपक गुंबाळे, यश रणमाळे, रोहित शिंदे, रोहित श्रीखंडे, अनिल केंग, शरद निंबाळकर, कोंडाजी महाले, जगन धूम, निर्मला धूम, सारिका डगळे, गिरीश टिकेकर, सचिन जाधव, वैभव ढवळे, तायडे, दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
