नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरातून गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केले आहेत. याच दरम्यान दोन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या दुचाकीचा तपास करीत असताना खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका युवकास अटक केली असता त्याने अकरा दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या चोरास मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार ताब्यात घेऊन सर्व वाहने जप्त केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी पत्रकार परिषद बोलवली होती.अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून नाशिक शहर परिसरातून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त
संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात बारकाईने तपास करण्याच्या सूचना देताच विविध पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांची दखल घेत चोरट्यांचा शोध सुरू केला असता मुंबई-आग्रा महामार्गावरील कांदा बटाटा भवन येथून महेश कोरडे यांची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास बालू असतानाच दि.३ सप्टेंबर रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस ठाणे अंमलदार नवनाथ उगले यांना गोपनीय माहिती मिळाली की,एक संशयित तरूण हा द्वारका सर्कल जवळील कांदा बटाटा भवन येथे वाहनांच्या आसपास फिरत आहे.
यासंदर्भात वरिष्ठांना कळवून या ठिकाणी मुंबई नाका पोलीस ठाणे ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक समद बेग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार समीर शेख,नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, योगेश अपसुंदे यांनी घटनास्थळी धाव घेत शिताफीने घेराव घालून या संशयित युवकास ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता गौस आजम अजीज शेख (वय २४, रा. तडवी नगर, मालेगाव) त्याने सांगितले. त्याला या ठिकाणी येण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला
अधिक चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणण्यात आले तेथे अधिक चौकशीत त्याने कांदा बटाटा भवन द्वारका येथून १६ जुलै रोजी काळ्या रंगाची दुचाकी चोरल्याची कबुली दिली व हे वाहन मालक मालेगाव येथे असल्याचे सांगितले. आरोपी गाँस आजम अजीज शेख यास अटक करून पोलीस निरीक्षक नरुटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तत्काळ तपास पथक मालेगाव येथे पाठविले,त्याची बारकाईने चौकशी व तपास सुरू केला असता संशयीत गौस आजम यांच्याकडे वेगवेगळ्या भरपूर किल्ल्या आढळल्या.
तो फॅशन प्रो व एच एफ डिलक्स या प्रकारच्या दुचाकी चोरत असे.आरोपी हा उजव्या हाताने अपंग आहे, त्यामुळे पोलिसांना त्यावर संशय येण्याचे कारण नसल्याने अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन आरोपी हा नाशिक, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणाहून काही दुचाकी विकल्याची व काही दुचाकी अजिंठा,संभाजीनगर येथे असल्याचे सांगितले.
त्यानंतर तपास पथकाने आरोपी गौस आजम याच्याकडून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुचाकी चोर गौस आजम यास न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीकडून तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे, तसेच त्याच्या इतर साथीदारांचाही शोध सुरु आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त परिमंडळ १ च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस
निरीक्षक (गुन्हे) सुधीर पाटील यांच्या सूचनेप्रमाणे मुंबई
नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देविदास गाढवे, समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, योगेश अपसुंदे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे,
जुबेर सय्यद, श्रीकांत कर्पे आदींनी ही मोहीम राबविली. जप्त केलेल्या दुचाकी: पोलिसांनी आरोपी गौशम यांच्याकडून पेंशन प्रो (एमएच १७ बीजी ६२८१), (एमएच ०५ सीडब्लु ०६३७), (नंबर नसलेली), एचएफ डीलक्स (एमएच ०३ इए ०९७६), (एम एच ३९ एए१५९), (एमएच १५ डीवाय ३३९४), (एम एच २०एफ सी ६४२९), सीडी डीलक्स (एमएच १५ सीएक्स ०४९८), (नंबर नसलेल्या दोन दुचाकी), पॅशन प्लस (एमएच १५ एफएच ६७०४),अशा पुढील कार्यवाही साठी मुंबई नाका पोलिस ठाण्यातील अधिकारी सज्ज असल्याचे समजते.
