मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल पालकमंत्र्याचा झरेकाठी जनसेवा तर्फे सत्कार

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल  संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी झरेकाठीचे भारतीय जनता पक्षाचे बुथ प्रमुख सोमनाथ डोळे,जनसेवा युवा मंचचे सदस्य,सुहास वाणी,तुषार वाणी,किरण वाणी,सुरेश बर्डे, श्रीकांत दाभाडे,आकाश वाणी, अनिल बर्डे, डॉ.मिलिंद वाणी, पोपट वाणी,डॉ.रमेश वाणी, जालिंदर वाणी,जयदीप तोंडे, 

राहुल वाणी,स्वप्निल वाणी, अभिनव वाणी,प्रवीण वाणी, ऋषिकेश वाणी,सौरभ वाणी तसेच जनसेवा युवा मंचाच्या सर्व सदस्य उपस्थित होते.सर्वांनी एक मुखाने,राधाकृष्ण विखे पा.यांचे अभिनंदन करत मराठा समाजासाठी आरक्षणाची यशस्वी मार्ग काढल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पा.यांनी मराठा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला गांभीर्याने हाताळत त्यासाठी योग्य तो निर्णय मिळून  देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला.त्यांच्या पुढाकारामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण दिशा मिळाली.या प्रयत्नामुळे  मराठा समाजाच्या सर्व स्तरामध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!