देवसाने येथे तुती लागवड आणि रेशमी उद्योग कार्यशाळा उत्साहात

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील 
देवसाने येथे शेतकऱ्यांसाठी तुती लागवड आणि रेशीम उद्योग कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.
            छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे 
या कार्यशाळेत कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर यांनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योग, तुतीची लागवड याबाबत मार्गदर्शन केले.तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग किती उपयुक्त आहे याची माहिती दिली. कृषी विस्तार अधिकारी सुनील हिरे यांनी रेशीम

उद्योग करतांना येणाऱ्या समस्था व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी तालुक्यातील रेशीम शेती करणारे शेतकरी सुरेश वाघ, वसंत देशमुख,भास्कर गावित आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अधिकारी प्रताप परदेशी,स्वाती भिसे, देवसानेचे सरपंच प्रकाश गायकवाड, उपसरपंच जालिंदर गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!