श्रीरामपूर दीपक कदम तालुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्त दर सालाबादप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने १९ वर्षापासून मतमाऊली यात्रोत्सव साजरा करत असताना संघटनेच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी चिवडाचा प्रसाद ठेवण्यात आला होता.
प्रसाद वाटपाच्या वेळी प्रथम बीड धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.जेम्स थोरात यांनी प्रसादाला प्रार्थनामय आशिर्वाद दिला.आणि प्रसाद वाटपास सुरूवात झाली.आणि वीस हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दिपक आणि प्रमोद शिंदे व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
या प्रसाद वाटपाच्या प्रंसगी सर्व पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य लाभले. प्रसंगी श्रीरामपूर प्रेस क्लबचे अशोक गाडेकर,अनिल पांडे,राजेंद्र बोरसे,नितीन चित्ते,स्वामीराज कुलथे,बद्रीनाथ वढणे,राजू सुर्यवंशी,गणेश मदुगुले या सर्वानी प्रसादाचा लाभ घेतला.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या मा.नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रकाश ढोकणे, राजेश अलघ, रविंद्र गुलाटी,संजय छल्लारे, सुभाष रननवरे,राजेंद्र आरोळे यांनी देखील प्रसादाचा लाभ घेतला.
प्रशांत लोखंडे यांनी पाण्याची सुविधा भाविकांना फळे दिली.
मा नगराध्यक्ष देवळाली प्रवराचे प्रकाश संसारे,ॲड शशिकांत संसारे,अशोक संसारे, प्रदिप छल्लाणी उद्योजक, अशोक कानडे,सर्वांसाठी चिवडा बनवणारे अल्पेश झुंरगे तसेच अविनाश काळे, मार्कस बोर्डे,अमोल कदम, भाऊसाहेब तोरणे, अजितकुमार सुडगे, विशाल पंडीत,
संदीप दळवी, किशोर गायकवाड, निशिकांत पंडित संदीप हिवाळे, सुनिल बोरगे,विजू त्रिभुवन,संदीप साळवे अशोक खंडागळे,बबलु लोंढे राजेंद्र भोसले राजु साळवे जेम्स पंडित डॉ.संजय दुशिंग प्रशांत शिंदे यासह महाराष्ट्र अल्पसंख्यांक खिस्ती विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम करून आपला सहभाग घेतला.यावेळी अनेक गोरगरीब भाविकांनी मोठ्या मनाने मदत केली.त्या सर्वांचे विकास परिषदेच्या वतीने भाविकांचे आभार.व्यक्त करण्यात आले.
