बहुजन क्रांती सेनेचे बेमुदत उपोषण सुरू
-दखलपात्र गुन्हा असताना अदखलपात्र गुन्हाची जाणीवपूर्वक नोंद
नाशिक दिनकर गायकवाड राजकिय दबावाखाली कर्तव्यात कसूर करुन आरोपीला पाठीशी घालणाऱ्या वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे व ठाणे अंमलदार निंबेकर व सचिन कक्कड यांचेवर कर्तव्यात कसूर करणे व शिस्तभंगाची कारवाई व्हावी म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती सेनेच्या वतीने सौ.शोभा रमेश रणशेवरे,रमेश मुरलीधर रणशेवरे, ज्योती रमेश रणशेवरे आणि सुजाता घेगडमल यांनी बेमुदत उपोषण सुरू आहे.
आपल्या मागणीत त्यांनी सांगितले आहे की सोमनाथ रणशेवरे,नंदा रणशेवरे,अलका मोकळ,भाउसाहेब मोकळ, कैलास मोकळ,विनोद रणशेवरे,अरूण रणशेवरे यांचेवर कायदेशीर कारवाई होणेबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे १ तारखेपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सर्व मौजे भोकणी या गावी राहत असून शेती व्यवसाय करतो आम्ही आमच्या शेतात काम करत असतांना सोमनाथ रणशेवरे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून माझी पत्नी सौ.शोभा रमेश रणशेवरे व मुलगी सुजाता घेगडमल यांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्कीने मारहाण केली.त्यात माझे पत्नी शोभा हिचे हातास दुखापत होवून रक्त निघाले.म्हणून मी पत्नी व मुलगी वावी पोलीस ठाण्याला गेलो असता पोलिसांनी आमची तक्रार न घेता आम्हांला ठाणे अंमलदार व सचिन कक्कड नामक पोलीस अधिकारी यांनी तुम्हांला कुणाकडे जायचे त्यांच्याकडे जाअशी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली कोणत्याही मंत्र्याकडे जा आम्हांला काहीच फरक पडत नाही तुमची तक्रार आमच्या पद्धतीने नोंदवु तुम्ही आम्हांला कायदे शिकवू नका असे बोलून दखलपात्र गुन्हा असतांना अदखलपात्र गुन्ह्याची जाणीवपूर्वक नोंद करून आमच्यावर अन्याय केला याबाबत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी सदरची वावी पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे व ठाणे अंमलदार श्री निंबेकर यांच्या लक्षात आणून दिली असता देखील त्यांनी फिर्यादिस पोलीस ठाण्यात वेठीस धरून मला,माझी पली व मुलगी रात्री १०.०० वाजेपर्यंत बसवून ठेवून संबंधितांवर कारवाई केली नाही याबाबत मी संबंधित पोलिस ठाणे व सर्व नाशिक पोलिस अधीक्षक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक निफाड,मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे आमच्या तक्रारी निवेदावर वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे ठाणे अंमलदार निंबेकर व सचिन काक्कड यांनी कर्तव्यात कसूर केल्याने सन २००६ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र.२९ दि.१२ मे २००६ चे प्रकरण ३ दप्तर दिरंगाई कायदा २००६ च्या (१०)चे (१)(२)(३) प्रमाणे दोषी आहेत
परिछेद ३ मध्ये नमूद केलेल्या शासकिय कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यांत यांची त्यांनी आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग कर संबंधितांना राजकीय दबावाखाली मदत केली आहे
कायद्याची मोडतोड करून शासनाच्या ध्येय धोरणांची पायमल्ली केली आहे.
तक्रार फिर्यादी सांगेल तशी घेऊन कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना आमच्या सांगण्यानुसार फिर्याद घेतली नाही त्यांनी फिर्यादिस पोलीस ठाण्याला वेठीस धरून मला, माझी पत्नी व मुलगी रात्री १०.०० वाजेपर्यंत वसवून ठेवून संबंधितांवर कारवाई केली नाही याबावत मी संबंधित पोलीस ठाणे व सर्व नाशिक,पोलीस अधिक्षक (ग्रामिण नाशिक पोलीस उपअधिक्षक निफाड, मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन दिलेले आहेत.आमच्या तक्रारी निवेदनावर पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे ठाणे अंमलदार निंवेकर व सचिन काक्कड यांनी कर्तव्यात कसूर केल्याने सन २००६ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २९ दिनांक १२ मे २००६ चे प्रकरण ३ दप्तर दिरंगाई कायदा २०६ च्या १० चे (१) (२) (३) प्रमाणे दोषी आहेत. परीच्छेद ३ मध्ये नमूद केलेल्या शासकीय कर्मचा-यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये शिस्त भंगाची कठोर कारवाई करण्यांत यांबी त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरूपयोग करून संबंधितांना राजकीय दवावाखाली मदत केली आहे व कायद्याची मोडतोड करून शासनाच्या ध्येय धोरणाची पायमल्ली केली आहे.
तक्रार फिर्यादी सांगेल तशी घेवून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असतांना आमच्या सांगण्यानुसार फिर्याद घेतली नाही तरी आमच्या मागणीनुसार तक्रार घेवून पोलिस उपनिरीक्षक. गणेश शिंदे , ठाणे अंमलदार निंबेकर व सचिन काक्कड यांच्यावर कर्तव्यात कसूर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यांवी
निवेदनावर सौ.शोभा रमेश रणशेवर रमेश मुरलीधर रणशेवरे ज्योती रमेश रणशेवरे सुजाता घेगडमल यांच्या सह्या आहेत.