पाणी पिण्याचा बहाणा करून वृद्धेच्या गळ्यातील ४० हजारांची ‌पोत घेऊन केला पोबारा

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड पाणी पिण्याचा बहाणा करून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी वृद्धेच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेल्याची घटना रामवाडी येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नंदिनी नारायण नायक (वय ६५, रा. श्रद्धा पार्क, रामवाडी, नाशिक) या दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गावातील कामे आटोपून राहत्या घरी आल्या. त्यानंतर त्यांच्यापाठोपाठ दोन अनोळखी इसम आले. 

त्यांनी नायक यांच्याकडे पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा केला. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यात असलेली ४० हजार रुपये किमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत महिलेला काही कळायच्या आत गळ्यातून बळजबरीने ओढून जबरी चोरी करून नेली.

यावेळी फिर्यादी महिलेने एका चोरट्यास पकडून आजूबाजूच्या नागरिकांना आरडाओरडा करून बोलावले; मात्र तोपर्यंत चोरटे महिलेच्या हाताला झटका देऊन पळून गेले. ऐन मध्यवस्तीत असलेल्या सोसायटीत घडलेल्या या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!