श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर क्रीडा समितीच्या वतीने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अशोक मैदानावर पार पडल्या. १४ वर्षे वयोगट मुलींचा अंतिम सामना न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि अशोक आयडियल स्कूल यांच्यात रंगला. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळी करून न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संघाने विजय मिळवला.अंतिम सामन्यात अन्नपूर्णा झरे, प्रांजल गवारे,आर्या आदिक, सावरी खटाने, गौरी हरदास, अनुष्का पवार, पलक पांडे, वैष्णवी इंगळे, सिद्धी आदमाने, इकमजीत कोर सेठी आणि खुशी केशरवाणी श्रेया सनानसे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रतिस्पर्धी संघावर मात केली.
विजेता संघास क्रीडा मार्गदर्शक नितीन गायधने आणि धर्मराज कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेतेपद मिळाल्याबद्दल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे, सचिव जन्मजय टेकावडे आणि बाळासाहेब ओझा स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय घोगरे यांनी संघाचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
