गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील देसराणे येथील तरुण विनोद बाबुराव राजभाज (४०) हा गणेश विसर्जन करण्यासाठी गेला असता पुनंद नदीपात्रात पाय घसरूण पडल्याने पाण्यात वाहून जात बुडून त्याचा मृत्यू झाला.
           छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे 
त्याच्या जाण्याने देसराणे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी,दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. याबाबत कळवण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेर्भेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वाणे तपास करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!