नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट आणि चिंता व्यक्त होत आहे.
दिंडोरीतील उंबरेमाळ येथे करंजखेड शिवारात खिरुड फाय येथे दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून यात रस्त्यालगत उभ्या असलेल्या युवकाचा समावेश आहे.तर
हिरामण काशिनाथ बागूल रा. उंबरेमाळ, ता.सुरगाणा हे त्यांचे नातेवाईक लीला जाधव यांच्या समवेत वणी सापुतारा रस्त्यावरून (एमएच १५ एफएच ७२८६) क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन जात असताना समोरुन अनियंत्रित वेगात (एमएच १५ एचएस ८९५०) या क्रमांकाची मोटारसायकलने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात हिरामण बागूल व लीला जाधव हे जखमी झाले तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राजू माळेकर रा. कापाची करंजी ता. सुरगाणा यास सदर मोटारसायकलने धडक दिली. या विचित्र अपघातात एकूण तीन जखमी झाले. (एमएच १५ एचएस ८९५०) या क्रमांकाच्या वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून
भरधाव वेगातील सिटीलिंकने चुकीच्या साईडला जाऊन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या महेंद्र जितो वाहनाला धडक दिली.नंत्यात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.
तेजस कत्वरु आल्हाट रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, जुने विमानतळ, चाळीसगाव, ता. चाळीसगाव हा पंचवीस वर्षीय युवक महेन्द्र जितो है। वाहन चालवत दिंडोरी-नाशिक या रस्त्यावरून मार्गक्रमण करत होता. यावेळी समोरून भरधाव वेगात राँग साईडने (एमएच १५ गीव्ही ७७२०) क्रमांकाचे सिटीलिंक हे वाहन आले व या वाहनाने महेंद्र जितो या वाहनाला धडक दिली. पिंपळणारे गावचे शिवारात दिंडोरी ते नाशिक रस्त्यावरील मातोश्री पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात तेजस कचरु आल्हाट हा गंभीर जखमी झाला. उपचारार्थ त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेजस याचे फिर्यादीवरुन महेन्द्र नारायण जगताप, रा. नविन कोर्टाजवळ,सिन्नर या सिटीलिंक बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
