बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लावून दिले.त्यानंतर आईने जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. धारून तालुक्यातील मातृत्वाला काळीमा फासणारी ही घटना चार वर्षांनी उघडकीस आली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
आई आणि नातेवाईकांनी सातवी शिकणाऱ्या लेकीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.त्यानंतर समोर आले की,आईचे जावयासोबत अनैतिक संबंध आहेत.एवढेच नाही तर पतीने त्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्या मुलीने सासूला हे सगळे सांगितले.पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मानसिक आणि शारीरिक छळानंतर त्या मुलीने चार वर्षांनंतर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धारून तालुक्यातील गावात पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आई सोबत राहत होत्या. २०१६ मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले. त्यानंतर २०१७ मध्ये पीडित मुलगी सातवीत शिकत असताना तिच्या आईने मंदिरात गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. शिकण्याचा वयात तिच्या आईने त्या मुलीवर संसाराचे ओझे टाकले. हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाले असून पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आई, सासू, मावशी,चुलत दीर, चुलत सासरा
आणि चुलत सासूने लग्नासाठी जबरदस्ती केली. काही दिवसांनी अल्पवयीन
मुलीला आईने सासरी नांदायला पाठवले. तिथे गेल्यावर पतीने तिच्यासोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास झाल्याचा तक्रारही
तिने पोलिसांना केली आहे. तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास द्याचे, असे आरोप तिने केले आहे. शेवटी आई आणि पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घरातून पळ काढत आजी आजोबांचे घर गाठले.
या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाईला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली.त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला. आता घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
