विश्व हिंदू परिषद बजरंग दल साकुर उपखंडाचा प्रथम वर्धापन
साकुर विशाल वाकचौरे संगमनेर विश्व हिंदू परिषद बजरंग दल साकुर उपखंडाच्या प्रथम वर्धापन दिन तसेच येऊ घातलेल्या दुर्गामाता दौड निमित्त दि. २६, २७ व २८ सप्टेंबर रोजी साकुर परिसरातील नवरात्र उत्सव मंडळात विविध कार्यक्रम पार पडला.
सहभागी मंडळात देवगिरे वस्ती, मुक्ताई मंडळ,हिवरगाव गावठाण,गाडेकर मळा,तसेच भोनाई माता हिरेवाडी नवरात्र मंडळांचा समावेश होता.या ठिकाणी बजरंग दलाचे कार्य, उपक्रम तसेच लव्ह जिहाद, धर्मांतरण,गोसंवर्धन व संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यासोबतच दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होण्याचे तसेच संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले.
आज सोमवारी सायं. ७.३० वा.वाडेकर वस्ती नवरात्र उत्सव, मांडवे गावठाण नवरात्र उत्सव गुंड मळा, मांडवे नवरात्र उत्सव व उद्याचा मंगळवारी सायं. ७.०० वा. कुंभार गल्ली मंडळ, साकुर, श्री स्वामी समर्थ नवरात्र उत्सव, साकुर श्रीकृष्ण नवरात्र उत्सव, साकुर येथे विविध कार्यक्रम होणार असून, सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
