-राहुरीत शिवशंभू स्वराज्य मोहिमेच्या नियोजनाची बैठक उत्साहात.
राहुरी प्नतिनिधी शिव-शंभू प्रतिष्ठान 'आयोजित "शिवशंभू स्वराज्य मोहीम" रायगड गडकोट भेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कार्यक्रमासाठी बैठकीचे आयोजन धर्मराडी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृह,राहुरी येथे नुकतेच करण्यात आले होते करण्यात आले होते.
बैठकीला प्रमुख उपस्थिती ह.भ.प.भारत महाराज जाधव(कैकाडी महाराज मठ, पंढरपूर.यांनी मार्गदर्शन केले.धर्माच्या नावाखाली खोटा धर्म सांगून समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.धर्म आणि जाती मध्ये भांडणे लावली जात आहेत.संतांच्या विचारातून स्वराज्य निर्माण झाले आणि स्वराज्याच्या प्रेरणेतून संविधान निर्माण झाले आहे.म्हणून संविधान दिनाच्या दिवशी २६ नोव्हेंबरला मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्देश समजून सांगितला.आणि राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीला विलास ढोकणे, भरत धोत्रे, सुरेश चौधरी,मच्छिंद्र ढोकणे,संजय खर्डे, भास्कर गाडे, मंजाबापू कोबरणे, भगवान खर्डे,मन्सूर पठाण, दीपक पंडित, नवनाथ ढोकणेअभिजित दुशिंग,तुषार ढोकणे,भास्कर वायळ,शांताराम आंबेकर आदी उपस्थित होते बैठकीचे आयोजन शिव शंभू प्रतिष्ठान, अहिल्यानगर च्या वतीने करण्यात आले.
