मा.नगरसेविका स्नेहल खोरेंचा पुढाकार
श्रीरामपूर दिपक कदम दरवर्षीप्रमाणे येथील मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी गणपती सजावट स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला.घरी आलेल्या ज्येष्ठ गौरींचे स्वागत आकर्षक देखाव्यांनी केल्याची माहिती मा नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना स्नेहल खोरे म्हणाल्या की,श्रीरामपूर शहरात गणेशोत्सव काळात अनेक महिलांच्या घरी ज्येष्ठ गौरींचे आगमन होत असते. महिलांनी केलेल्या आकर्षक सजावटीस प्रोत्साहन मिळावे म्हणून मोरया फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रभागातील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली जाते.
ऑनलाईनच्या जगात परीक्षकांसह थेट महिलांच्या घरी जाऊन गौराई देखाव्यांचे परीक्षण करण्याचे वेगळेपण जपण्याचा मोरया फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे सौ.स्नेहल खोरे यांनी सांगितले.
यंदाच्या स्पर्धेत पहिला क्रमांक स्वप्नाली निलेश झिरंगे,मनिषा रामेश्वर रोडे यांचा दुसरा क्रमांक, तर रेणुका राजेश राऊत यांचा तिसरा क्रमांक आला.
युक्ती शुभम चोथवे यांच्या गौराईला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. स्वतःच्या हाताने घरी तयार केलेल्या १२ जोतिर्लिंगचा देखावा मनमोहक होता. तर जेजुरीची प्रतिकृती साकारलेल्या गौरी सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून लिटिल बर्ड्स स्कूलच्या मुख्यध्यापिका वसुंधरा औताडे-गदिया यांनी काम बघितले. तर सीमा पटारे,विद्या गोरे, अनिता जगताप, अलका राऊत आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.