मांचीहिल संस्थानच्या पाच दिवसीय बाप्पाला उत्साहात निरोप

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड सालाबादप्रमाणे यंदाही संगमनेर तालुक्यातील मांचीहिल संस्थानातील विविध विभागात पाच दिवसीय गणरायाची थाटामाटात स्थापना करण्यात आली होती.
पाच दिवसांपूर्वी ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुकीने गणरायाचे आगमन झाले.पाचही दिवस सकाळ-संध्याकाळ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरत्या झाल्या तर रक्तदान शिबीर,खेळ स्पर्धा, गुणदर्शन यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय,हॉस्पिटल, कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालय,ज्ञानगंगा विद्यानिकेतन,सूर्या नर्सिंग कॉलेज,डॉ.अब्दुल कलाम आयटीआय,एकलव्य अध्यापक विद्यालय व महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल या सर्व विभागात गणेशोत्सव साजरा झाला.

नुकतेच पाच दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाच्या सजवलेल्या अश्वरथातील मिरवणूक व विद्यार्थ्यांचे गणेशवंदना नृत्य आकर्षण ठरले.भव्य गणेशमूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले.सायंकाळी ६ वाजता प्रवरा डाव्या कालव्यात सर्व गणपती मूर्तींचे विसर्जन झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, प्राचार्य, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालय व संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी संसद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!