काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मत चोर गद्दी छोड स्वाक्षरी अभियानास प्रारंभ

Cityline Media
0
अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा धाडसी निर्णय 
संगमनेर प्नतिनिधी मत चोरी सारखे संविधान विरोधी कारस्थाने वरून सत्ता  बळकावणाऱ्यांचे पितळ उघडे पाडत काँग्रेसचे खासदार,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी रान उठवले आहे.त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्हा कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने नुकतेच मत चोर गद्दी छोड स्वाक्षरी अभियानास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
प्रसंगी संगमनेर येथे पत्रकार परिषद घेऊन मतदान याद्या लोकसभेसाठी झालेल्या मतदान यादीतील गैरप्रकार उघडकिस आणत थेट केंद्रीय निवडणूक आयोग कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे.त्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदार याद्या बाबत मोठा निर्णय घेतला असला की ही मत चोरी झालीच कशी हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

मत चोरी सविधानद्रोही कृती असून याबाबत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली "मत चोर, "गद्दी छोड, स्वाक्षरी अभियान देशभर सुरू असून.अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने संगमनेर मधून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.सी.डब्ल्यू सी.वर्किंग कमिटीचे सदस्य,राज्याचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संगमनेर मधून सुरुवात करण्यात झाल्याने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण होण्याचे चित्र दिसुन येते आहे.

प्रसंगी जिल्हाध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, संगमनेर मर्चंट बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड,जिल्हा काँग्रेसचे कायदेशीर सल्लागार,तथा जिल्हा उपाध्यक्ष,

ॲड.प्रकाश संसारे,जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा सहसरचिटणीस शशिकांत थोरात,शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर,जिल्हा सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग,संगमनेर शहर अध्यक्ष सोनू गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष 

सोपान धेनक,राहाता तालुकाध्यक्ष साहिल म्हस्के, राहाता शहराध्यक्ष अमोल आरणे कोपरगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पगारे,संगमनेर तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे, जिल्हा सचिव सुरज म्हकांळे, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे, नवनिर्वाचित संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक शेळके,रवींद्र शेळके,अजय चव्हाण, श्रावण गायकवाड, दादासाहेब शेळके,अशोक शेळके,चांगदेव खेमनर,भाऊराव सरबंदे,रमेश भोसले,शिरीष गायकवाड, विकास बोरुडे,युवराज पारडे, आदी कॉग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!