आश्वी संजय गायकवाड श्रीरामपूर येथील चंद्ररूप डाकले जैन कॉलेजतर्फे आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ६३ वी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील मांची हिल येथील अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयची व्दितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. शरयू शरद कापडी हिने “कर्मवीर भाऊराव पाटील : एक द्रष्टा ज्ञानयोगी” या विषयावर प्रभावी भाषण सादर करून उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
शतिच्या यशाबद्दल संस्था प्रमुख शाळीग्राम होडगर, प्राचार्य डॉ. मोहन मोरे, संचालिका नीलिमा गुणे,अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे आदींनी अभिनंदन केले. या यशात प्रा. स्नेहल आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले असून शरयूच्या कामगिरीमुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
