आंदोलनाचा इशारा देताच श्रीरामपूर-मुंबई सुरू करण्याचे आश्वासन

Cityline Media
0


संगमनेर किशोर वाघमारे श्रीरामपूर मुंबई बस लोणी संगमनेर मार्गाची बस कोरोना काळाच्या पाच वर्षापासून श्रीरामपूर बस डेपो ने अचानक बंद केल्याने संगमनेर येथील शिवसेना अनुसूचित जाती विभाग अहिल्यानगर जिल्हा प्रमुख किशोर वाघमारे व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात इशारा देत विभागीय नियंत्रक राजेंद्र जगताप यांना निवेदन दिले होते त्यानुसार निवेदनाची दखल घेत आगर प्रमुख श्रीरामपूर बस डेपो यांनी श्रीरामपूर मुंबई ही बस ६ ऑक्टोबर पासून नियमितपणे सुरू करणारा असल्याचे आश्वासन दिले.
श्रीरामपूर मुंबई बस सुरू होणार असल्याने प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ही बस गेली पाच वर्ष बंद असल्यामुळे लोणी या ठिकाणी कॉलेजेस जास्त असल्यामुळे मुंबईकडे जाणारे व येणारे विद्यार्थी व पालकांची संख्या मोठी असल्याने नाईलाजाने त्यांना लक्झरी बसने जावे लागत होते.

 लक्झरी बस बस भाडे पाचशे ते हजार रुपये घेत असत त्यामुळे महिला जेष्ठ नागरिक सवलती पासून यांना वंचित राहावे लागत होते त्यामुळे शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.शिवसेना नेते व परिवहन मंत्री  नामदार प्रताप सरनाईक जिल्हा विभागीय नियंत्रक अहिल्यानगर राजेंद्र जगताप यांना शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने श्रीरामपूर मुंबई बस सुरू करण्याचे निवेदन दिले होते.

 निवेदनाची दखल घेत सदर बस सुरू होणार असल्याने नागरिक वर्गसह महिला विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून श्रीरामपूर बस आगराचे विशेष आभार मानले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!