आदिवासी प्रकल्प अधिकारी अरपिता ठुबे यांची काळूने गावास भेट

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण आदिवासी प्रकल्प अधिकारी अरपिता ठुबे यांनी काळूने गावाला भेट देऊन ग्रामविकास कामांचा आढावा घेतला.
ग्रामस्थांनी वारकरी पद्धतीने त्यांचे स्वागत केले.या भेटीत स्वदेश फाउंडेशन मार्फत राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना,नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनातील शेततळी आदी प्रकल्प पाहिले.शाळा स्वच्छता व शौचालयाचे उ‌द्घाटन करून योजना ग्रामसमितीकडे सुपूर्द करण्यात आली.

अरपिता ठुबे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या विकास प्रवासाबाबत चर्चा केली. गावातील पशुसखी व स्वदेश मित्र आरोग्य स्वयं सेवकांचीही भेट घेऊन त्यांचे कार्य जाणून घेतले.

या भेटीस स्वदेशचे वरिष्ठ व्यवस्थापक संकेत तांदळे,उप महाव्यवस्थापक वैभव पवार, तालुका व्यवस्थापक कोमल माने,पाणी व स्वच्छता व्यवस्थापक राहुल ब्राम्हणे,गाव समन्वयक मोहसिन सय्यद,कृषी तज्ज्ञ निनाद दर्गे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!