खळीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत ‌राज अभियान निमित्त विशेष ग्रामसभा उत्साहात

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दिनानिमित्त खळी येथे ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.
सदर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच विलास गजानन वाघमारे होते तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वैशिष्ट्ये व मुख्य घटकाचे वाचन गावचे ग्रामविकास अधिकारी अनिल माधव वाणी यांनी करत पंचायत राज अभियान नागरिकांना समजावून सांगितले.

प्रामुख्याने लोकाभिमुख प्रशासन तक्रार निवारण व्यवस्था ग्राम पातळीवरील सेवा व दाखले ऑनलाईन देणे ग्राम ग्राम विकास समिती कामकाज अधिक सक्षम करणे तसेच गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरणांमध्ये ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण यावर भर देण्यात आला.

पशुवैद्यकीय उपचार केंद्र सुविधा व्यायाम शाळा सुविधा धार्मिक स्थळाचे सुशोभीकरण करणे तसेच लोकसहभागातून श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यामध्ये प्रामुख्याने लोकसहभाग व श्रमदान चळवळ गावात स्वच्छता ठेवणे रस्ते कामे दुरुस्ती शेतकऱ्याच्या पानांचा रस्त्यांना प्राधान्य देणे इ विषय चर्गेचिले गेले.

जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा ताळेबंद करून जल स्रोत व्यवस्थापन व बळकटीकरण वृक्ष लागवड करणे व त्याच्या संवर्धन करणे गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत

इतर योजनांशी अभिसरण करत मनरेगा योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणे घरकुल व मनरेगा योजनाचे अभिसरण करणे जल संवर्धन अंतर्गत नवीन विहिरी विहीर दुरुस्ती करणे तिचे पुनर्भरण करणे शेततळे डाळीचे बांध जनावरांचा गोठा कुक्कुटपालन

शेळीपालन बायोगॅस उभारणे वर्मी कंपोस्टिक करणे तसेच सक्षम पंचायत समिती व लोक नियोजन अंतर्गत कर व पाणीपट्टी वसूल करणे लोक वर्गणी द्वारे लोका उपयोगी सुविधा उपलब्ध करून स्वत उत्पन्न व वसुलीमध्ये वाढ करणे प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.

बचत गट स्वयंसहायता समूह माध्यम शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये महिलांचा सहभाग शेतकरी उत्पादक संस्था व सेंद्रिय शेती प्रस्थान देणे आदी महत्त्वाचे अभियान घटक ग्रामसेवक अनिल वाणी यांनी वाचन करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नागरिकांच्या व गावाच्या 

सर्वांगीण विकासासाठी शासनाचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून या उपक्रमामध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजना यशस्वी करावी असे आव्हान यावेळी ग्रामसेवक अनिल वाणी यांनी उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे यांनी शासनाचा उपक्रम अतिशय सुंदर असून पंचायत राज अभियान नागरिकांसाठी सुंदर उपक्रम असून यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून हरित गाव करण्याकडे लक्ष केंद्रित करावे व अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड सविता शरद नागरे नंदू उगलमुगले श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान सानप उपाध्यक्ष हौशीराम नागरे सोमनाथ भाऊसाहेब नागरे सह्याद्री विद्या प्रसारक समाजसेवा संस्थेचे 

विद्यमान संचालक चंद्रभान तांबे बबन नागरे गुलाब शेख नामदेव लबडे तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लहानू नागरे रावसाहेब तांबे नामदेव लबडे शिवाजी लबडे बबन नागरे आदी प्रमुख मान्यवर विशेष ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सौदामिनी मंकाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकरवाडीचे शिक्षक श्री.कडलक गांगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री हजारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळीच्या शिक्षिका श्रीमती दिघे अंगणवाडी सेविका ललिता चकोर श्रीमती भांड अशा सेविका आदी प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा संपल्यानंतर ऑनलाईन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रम आयोजित केला होता त्याचा लाभ येथील नागरिकांसह विद्यार्थी वर्गांनी घेतला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!