तोतया पोलिसांनी चार तोळ्यांचे दागिने केले लंपास

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड दाम्पत्यास रस्त्यात थांबवून पुढे चेकिंग चालू असून, सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या चेकिंगमध्ये तुम्हाला फाईन लागेल,असे खोटे सांगून तोतया पोलिसांनी चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरून नेल्याचा प्रकार चिंचोली गावात घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जिजाबाई सोपान भिसे (रा. मोहदरी, ता. सिन्नर) या काल (दि. १२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास पतीसह चिंचोली गावाजवळील उड्डाणपुलावरून खाली उतरत होत्या. त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांच्या पतीने त्यांना थांबविले. त्यांना पोलीस असल्याचे भासवून

त्यांच्याजवळ असलेले खोटे आयकार्ड दाखविले. पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे. सोन्याचांदीचे दागिने तपासण्याच्या बहाण्याने फाईन लागेल, असे खोटे बोलून फिर्यादीजवळील ४० ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे व दोन ओम्पाने असे एकूण ६० हजार रुपये किमतीचे दागिने तोतया पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर फिर्यादी भिसे व त्यांच्या पतीला बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वास संपादन करीत दाम्पत्याची दिशाभूल करीत व त्यांची फसवणूक करून हे दागिने चोरी करून पसार झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन तोतया पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!