मालवाहू ट्रक गणपती विसर्जन मिरवणूकीत घुसला;आठ जणांचा मृत्यू

Cityline Media
0


बेंगळुरू सिटीलाईन न्यूज नेटवर्क कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील मोसाले होसाहल्लीजवळ एका भरधाव मालवाहू ट्रकने थेट गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीत तल्लीन झालेल्या गणेश भक्तांवर भरधाव ट्रक आल्याने, एकच गोंधळ उडाला. ट्रकच्या धडकेने घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जणांनी रुग्णालयात जीव सोडला. याशिवाय या भीषण दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ
घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ट्रक चालक नशेत होता का? ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? की अन्य काही कारण होते याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी ट्रक दरम्यान, या भीषण दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, 'ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकूल कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मी सर्व जखमींनी लवकर सुदृढ आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना करतो. जखमींना योग्य मोफत उपचार देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत.'
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!