अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील मंदिर चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची टोळी केली ‌जेरबंद

Cityline Media
0


अहिल्यानगर प्रतिनिधी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्हयात मंदिर चोरी गुन्हे उघडकी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ राहुल व्दारके,पोहेकॉ/ लक्ष्मण खोकले, पोहेकॉ फुरकान शेख, पोहेकॉ दिपक घाटकर, पोना रिचर्ड गायकवाड, पोना भिमराज खर्से, 

पोकॉ रमीजराज आतार, पोकॉ सुनिल मालणकर यांचे विशेष पथके बनवुन अहिल्यानगर जिल्हयातील मंदिर चोरी गुन्हे उघडकी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिले.  त्याअनुषंगाने विशेष पथकाने जिल्हयातील मंदिर चोरी संदर्भात विविध गुन्हयाची माहिती घेतली असता, 

नगर तालुका पो.ठाणे येथे दाखल प.ना.कॉ. रजिस्टर नंबर ७६७/ २०२५,भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३303(२) प्रमाणे दाखल अदखलपात्र गुन्हयातील आरोपीबाबत गुप्त खबरीमार्फत तसेच व्यावसायिक व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे दिपक कचरे, रा.लोहगाव, ता. राहाता, जि.अहिल्यानगर 

हा भुईकोट किल्ला मैदान भिंगार येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन,त्यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचुन, गुप्त माहितीप्रमाणे इसम ताब्यात घेऊन,चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांव १) दिपक रावसाहेब कचरे, वय- २४ वर्षे,असे सांगितले.

 असता,त्यांचे सोबत अजुन दोन इसम यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांवे २) किरण बाळासाहेब राऊत, वय- २० वर्षे, ३) अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे, वय- १८ वर्षे, सर्व राहाणार नेहरुनगर, लोहगाव,ता.राहाता, जि. अहिल्यानगर असे सांगितले,

 अधिक चौकशी केली असता, त्यांनी तीघांनी मिळुन नगर तालुका पो.ठाणे हद्दीत दाखल प.ना.कॉ.रजिस्टर नंबर ७६७/२०२५ ,भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देवुन, दानपेटीतील ७१,०००/- रुपये वाटुन घेतले बाबत माहिती दिली. त्यांची अंगझडती घेतली असता,

 त्यांचेकडुन एकुण ३२,०६०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपी १) दिपक रावसाहेब कचरे याला विश्वासात घेऊन,अशा प्रकारे आणखी गुन्हे केलेबाबत विचारपुस केली असता, आरोपी २) व ३) साक्षीदारांसह, तीघांनी मिळुन अहिल्यानगर जिल्हयात विविध ठिकाणी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची माहिती दिलेवरुन, खालील गुन्हे उघडकीस आले आहे.

अ.क्र. पोलीस ठाणे नांव गुन्हा रजि.नं. कायदा कलम
१ नगर तालुका प.ना.कॉ. ७६७/ २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) २ नगर तालुका ५९४/ २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२)
३शिर्डी १९५ / २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३/ चे कलम ३०५3(डी), ३३१(४)

४ राहुरी ७०३/ २०२५/ भारतीय न्याय संहीता २०२३ चे क . ३३१(३),३०५(ए),३२४(४)


५ ४०५/ २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३/ चे कलम ३०५(डी), ३३१(४)

६ लोणी ४८४/ २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५(बी), ३३१(२)

७ श्रीरामपूर तालुका ३६१/ २०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५/ ३३१(४)

८ घारगांव ३६०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३४33४(१)
ताब्यातील आरोपी नामे १) दिपक रावसाहेब कचरे, वय- २४ वर्षे, २) किरण बाळासाहेब राऊत, वय- २० वर्षे, ३) अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे, वय- १८ वर्षे, सर्व राहाणार नेहरुनगर, लोहगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर आणि एकुण ३२,०६०/- रुपये किमंतीचा जप्त केलेला मुद्देमाल नगर तालुका पो.ठाणे येथे जमा करण्यात आला असून, पुढील तपास नगर तालुका पो.ठाणे करत आहेत.

सदरची कारवाई.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!