श्रीरामपूरातून ५ गावठी पिस्तूल ९ काडतुसे व मोटर सायकलीसह ३ आरोपी जेरबंद
श्रीरामपूर दीपक कदम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडले आहे त्यांच्याकडून ५ गावठी पिस्टल, ९ जिवंत काडतुसे व पल्सर मोटारसायकल जप्त - ३ आरोपी ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. १४८५ पंकज व्यवहारे, पोहेकॉ. १७३३ अतुल लोटके, पोहेकों ८१४ उमेश खेडकर, पोहेकों, ९११ दिगंबर कारखेले व पोहेकॉ.८०३ मल्लिकार्जुन बनकर,पोहेका दिपक घाटकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल फुरकान शेख,पोकों प्रशांत राठोड,पोकों विशाल तनपुरे,चास फौजदार उमाकांत गावडे,यांनी पथकासह रेल्वे उड्डाण पुलाजवळ,हरेगाव फाटा येथे सापळा रचून कारवाई केली.
छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले-
अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, वय २३ वर्षे,रा. फत्तेपुर,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर अजय शिवाजी मगर, वय २५ वर्षे,रा.नांदुर शिखरी,ता.नेवासा, जि. अहिल्यानगर. योगेश मच्छिंद्र निकम, वय ३५ वर्षे, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण ५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) ९ जिवंत काडतुसे पल्सर मोटारसायकल क. एमएच १७ डीजी ५७६७ असा एकूण मुद्देमाल किंमत - ४,०९,०००/- रुपये प्राथमिक चौकशीत आरोपी कडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं ८१८/२०२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ कलम ३3/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
