नाशिक दिनकर गायकवाड गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील शिलापूर शिवारातील जोंधळे यांच्या वस्तीलगत उसाच्या शेताजवळ बिबट्यांचे वारंवार दर्शन घडत असल्याने येथील नागरिक भयभीत झाले आहे संध्याकाळी रात्री आणि दिवसा सुद्धा येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.तो आपली हद्द बदलत असला तरी येथील मानवी जीवन अस्वस्थ झाले आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी येथे पिंजरा लावला होता; परंतु बिबट्या सापळ्यात अडकला नाही.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे या बिबट्यास त्वरित जेरबंद करण्यात यावे अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांनी केली आहे.