डोंबिवली प्रतिनिधी येथील डोंबिवली ठाकुर्ली शहर व ग्रामीण विभागातील रस्त्यावरील खड्ड्याची दुरूस्ती बाबत नुकतेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम विभागास आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या वतीने पत्र देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
निवेदनात म्हटले होते की रस्ते वाहतूकीस योग्य झाले नाही तर आबेडकरावादी जनहित संघटनेच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि चालढकलपणास कंटाळून रस्त्यावरील खड्याची दुरुस्ती करावी या मागणी साठी डोंबिवली मध्ये आंबेडकरवादी जनहित संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी कॉ.काळू कोमस्कर (लाल बावटा), मधुकर बनसोड, सुरेंद्र गौतम(बहुजन समाज पार्टी ) गौतम गवई, प्रशांत टेकुळे, सुरेखा जाधव(वंचित बहुजन आघाडी) दिपक भालेराव ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर )
गौतम वाघचौरे (बहुजन मुक्ती पार्टी ) आणि शैलेंद्र पाटील (एआय आरएसओ) अक्षय पाठक विश्वविकास गायकवाड,सुरेश नेरकर,भारत धाबे,करण जाधव,अशोक मोहिते, राजेश पवार उपस्थित होते नेतृत्व संदीप गजघाट यांनी केले.
या आंदोलनाची दखल घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पत्र दिले असून दि.५ ऑक्टोबर पर्यंत सर्व खड्डे डांबरीकरण करण्यात येतील अशी लिखित आश्वासन दिलेले आहे. परंतु पंधरा दिवसांत या रस्त्यावरील खड्डे मुक्त झाले नाही तर आंबेडकवादी जनहित संघटना पुन्हा आंदोलन करेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी
