आश्वी खुर्द संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ.कल्पना क्षिरसागर व डॉ.सचिन क्षिरसागर या दाम्पत्याचे नवे कपड्यांचे दालन एस.के कलेक्शन आता आश्वी पंचक्रोशीतील बाजार पेठेत ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा खर्चात खुर्दमध्ये ग्राहकांसाठी दालन खुले करत असुन या दालनाचे उद्घाटन मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वा.युवानेते मा.खा डॉ सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे .
अतिशय नाविण्यपूर्ण असलेले हे दालन आश्वी खुर्द बस स्थानकासमोर प्रशस्त व आकर्षक जागेत उभारले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आणि कौलाघात बदलत सर्वच फॅशनेबल पद्धतीचे कपडे येथे उपलब्ध होणार तेही सर्वात स्वस्त आणि मस्त दरात परवडणाऱ्या कपड्यांचा उत्तम पर्याय मिळणार आहे
उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्वागतासाठी आकर्षक सजावट, फलक व पोस्टरमुळे गावाचा माहोलच रंगतदार झाला आहे.
क्षिरसागर दाम्पत्य हे डॉ. सुजयदादांचे खंदे समर्थक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी व सामाजिक क्षेत्रात सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या भव्य कलेक्शनमुळे आश्वी खुर्द परिसरातील ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार कपड्यांचा नवा ठिकाण मिळणार आहे.