भिंगार मध्ये तिरट खेळणाऱ्या तर नेवाशात अवैध दारू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Cityline Media
0

अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती जमा करून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत नुकतेच आदेश दिलेले आहेत.त्याप्रमाणे पोलिस विभागाची हलचाल सुरू असुन नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेकडुन भिंगार कॅम्प,नेवासा हद्दीमध्ये जुगार तसेच अवैध दारु विक्रेत्यावर छापे, १० आरोपीकडुन ६७,४५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.
अधिक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले,हृदय घोडके,सुयोग सुपेकर,अतुल लोटके,अमोल आजबे, प्रकाश मांडगे भगवान धुळे यांचे पथक तयार करुन भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये,तसेच नेवासा पोलीस ठाणे हद्दीतमध्ये पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,जालींदर नामे,किशोर शिरसाठ अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी रवाना केले होते.

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोहेकॉ लक्ष्मण खोकले यांना गुप्त खबऱ्यामार्फत काही इसम नगरदेवळे शिवारातील हराळेमळा येथे झाडाखाली पत्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने,सदर ठिकाणी जावुन खात्री करता सदर ठिकाणी डावांमध्ये काही इसम गोलाकार बसुन पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसुन आले.सदर इसमांना जागीच बसण्यास सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्याची नावे १) प्रितम मारुती धाडगे वय-२४ वर्षे रा. नागरदेवळे फाटा, नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, २) राजु दशरथ धाडगे वय-४० वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, ३) सुनिल जार्नाधन गायकवाड वय-५८ वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, ४) महेश घनश्याम बोरुडे वय ३९ वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, ५) योगेश ज्ञानदेव हराळे वय ४७ वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, ६) आकाश गणेश धाडगे वय-२८ वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर, ७) सोमनाथ बाळासाहेब धाडगे वय-३१ वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांची व ते बसलेल्या ठिकाणची झडती घेता त्यांचे कब्जामध्ये रोख रक्कम, तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य साधने,मोबाईल असा एकुण ६०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. ५१०/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणारा इसम नामे रविंद्र राम तांबे (वय-२६) वर्षे रा.निडेगांव ता. नेवसा याचे कब्जातुन ५४५०- रुपये किमतीची देशी विदेशी दारु,तसेच इसम नामे अनिल नाना गव्हाणे वय ४० वर्षे रा. शिरसगांव ता.नेवासा हिचे कब्जामध्ये १५००/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु मिळुन आल्याने नेवासा पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे गु.र.नं. ८३८/२०२५ व ८३९/२०२५ स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकाने दिनांक २०/०९/२०२५ रोजी भिंगार कॅम्प, नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरील प्रमाणे कारवाया करुन एकुण ६७,४५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला असुन यापुढेही सतत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!