शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
September 26, 2025
0
चंद्रपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेच्या माध्यमातून नुकतेच बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला.यावेळी शेतकऱ्यांकडून बच्चू कडू यांची साध्वी चंफा माता मंदिराजवळून बैलगाडीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून शेतकऱ्यांनी बच्चुभाऊचे जंगी स्वागत केले. यानंतर माळेगाव बाजार येथील जाहीर सभेलाही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला २८ ऑक्टोबरला शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरला जायचे आहे असं आवाहन बच्चु कडू यांनी शेतकऱ्यांना केले,यावर शेतकऱ्यांनी सुद्धा बच्चु कडू यांना पाठिंबा देत नागपूरच्या मोर्चात सहभागी होण्याचा विश्वास दिला.
Tags
