दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथील सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रामलाल कोंडाजी कहार तर उपाध्यक्ष पदी बापू भिका जोशी यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
सदर सेवा सोसायटीची वाटचाल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.मा.खासदार डॉ सुजय विखे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्ष सौ शालिनी विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश जोशी उपस्थित होते.
सदर निवडी प्रसंगी सेवा सोसायटीचे मावळते अध्यक्ष भाऊसाहेब रबाजी जोशी उपाध्यक्ष पारूबाई तुकाराम जोरी हे दोघेही प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते तर दाढ खुर्द सेवा सोसायटीचे सचिव माधव हारदे सहसचिव दत्तात्रय पर्वत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत होते.
याप्रसंगी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक ह भ प शांताराम महाराज जोरी प्रवरा फळे भाजीपाला सेवा संस्थेचे संचालक अण्णासाहेब गेणूजी जोशी सरपंच सतीश कुंडलिक जोशी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सिताराम साळवे श्रीमती शोभाताई नामदेव वाडगे भागा गीते बाळासाहेब जोशी शिवाजी जोशी भीमराज बुदे डॉ.साईनाथ जोशी आप्पासाहेब जोशी विष्णू जोशी भीमराज जोशी रामदास बिरे कारभारी जोशी बाळासाहेब तागड राजेंद्र कहार भास्कर वाडगे आधी सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
