शेतकऱ्यांची भरपाईची मागणी
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे व परिसरातील पिंपरी लौकी अजमपुर पानोडी शिबलापूर दाढ खुर्द आदी परिसरात जोरदार दोन दिवस पाऊस झाला यामुळे येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे येथील ओढे नाले तुडुंब झाले असून येथील शेतामध्ये उभे असणाऱ्या बाजरी सोयाबीन कापूस तूर मत मूग मका यासारखे सर्व पिके पाण्याखाली गेले असून येथील शेतीला तळ्याचे स्वरूप आले असून येथे असणारे दोन तळे मोठाले व पाझर तलाव पूर्णपणे तुडुंब झाले.
येथील शेतीमधील पिके पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून गेले आहे त्यामुळे येथील शेतात उभे असणारे सर्व पीक सडली असून येथील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांनी मे जून महिन्यात बँकेकडून पीक कर्ज घेऊन मोठ्या कष्टाने पिक उभे केले होते.
परतीच्या पावसाने येथील शेतीचे फार मोठे नुकसान झाले असून माननीय तहसीलदार संगमनेर मंडल अधिकारी शिबलापुर तलाठी खळी यांनी त्वरित शेताची पंचनामे करून येथील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये शासनामार्फत विनाअठ मंजूर करून द्यावी व पंचनामे करून माननीय जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे पाठवावे अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली आहे.
