श्रीगोंदा कृष्णा निकम येथील महादजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्त्व सांगणारी नाटिका नुकतीच सादर केली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. भुजबळ,पर्यवेक्षक श्री.एकाड हिंदी व क्रीडा विभाग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परिपाठाच्या वेळी ह्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. यात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
जीवनात सर्वांनी खेळाडू वृत्ती अंगिकारली तर जीवनात आरोग्य व सुखाची प्राप्ती होईल असा संदेश यातून देण्यात आला.यात निहाल जमादार ,सार्थक गणिशे, शिवसाई निकम,विनोद खराडे, पृथ्वीराज जामदार,ध्रुवेश गिरमकर,अनिकेत कोथिंबीरे, आदित्य काळे,मयुरेश ढवण, सोहम जगताप,कृष्णा दुबिले, श्रेयस खेतमाळीस,
प्रमोद नागवे, नंदकुमार साळूंके,गौरव कवडे, अजिंक्य खामकर आदिंनी महत्त्वपुर्ण भूमिका सादर केली.
